अशोक ठाकरे कोरोनाचे १३ वे बळी / ऑनलाईन फ्राॅड : टोळी गजाआड / खोटी बिले-किसान सभेचा मोर्चा / MNN-1307

अशोक ठाकरे कोरोनाचे १३ वे बळी / ऑनलाईन फ्राॅड : टोळी गजाआड / खोटी बिले-किसान सभेचा मोर्चा / MNN-1307

बोगस बिले काढणा-या ठेकेदारांवर कारवाई व शेतक-यांच्या प्रश्नांवर किसान सभेचा भव्य मोर्चा १) शेतकऱ्यांची अवस्था कोरोना काळात अत्यंत वाईट झाली आहे. या शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्यावा तसेच कामे न करता बोगस बिले काढून विकासात बाधा आणणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी या मागण्यांसह अन्य १२ मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट प्रणीत अखिल भारतीय किसान सभेने वाडा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. जव्हार PWD मध्ये २०१० ते २०२० या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सुमारे ७५० कोटीची खोटी बिले निघाली असल्याच्या तक्रारी आहेत. २) वाडा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व शहरातील प्रसिद्ध अशोक टी हाऊसचे मालक अशोक कुशाभाऊ ठाकरे यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी कोरोनाने दुःखद निधन झाले. तालुक्यात कोरोनाने १३ वा बळी गेला आहे. ३) वाडा तालुक्‍यात आज ५३ नव्या रूग्णांची नोंद. ४) पालघर जिल्ह्यात ३७६८ रुग्णांवर उपचार सुरू तर २२७१४ बरे झाले. वसईत आज ७ रुग्णांचा मृत्यू. ५) रिलायन्स पिडीत शेतकऱ्यांचे उपोषण सुरू. ६) संभाजी ब्रिगेडच्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदावर तेजस भोईर यांची निवड. ७) ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक. ८) भिवंडीत ५७ तर शहापूर मध्ये ५८ नवे रूग्ण. ९) ठाणे जिल्ह्यात ५ लाख ८१ हजार ४६२ रुग्णांच्या चाचण्या त्यापैकी ४ लाख ४४ हजार ३३२ रूग्ण निगेटिव्ह तर १लाख ३५ हजार ०३७ रूग्ण पॉझिटीव्ह. अधिक माहितीसाठी अवश्य पाहा... www.MashalNews.in • संपादक शरद पाटील M-९८६७०१११०० (दि.७/९/२०२०) #MashalNewsNetwork #ThanePalgharNews #SharadPatil