#स्वप्नीलपाटील#वाडाभिवंडीरोड#सुप्रिमकंपणी वाडा-भिवंडी-मनोर या मुख्य रस्त्याची झालेली चाळण व त्यामुळे वारंवार होणारे अपघात यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे प्रवाशी जेरीस आले आहेत. वाडा-भिवंडी-मनोर हा बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आला असून या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रोज अपघात घडत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मुख्य रस्त्यासह तालुक्यात अगदी अलिकडे बनवलेले रस्तेही खड्ड्यात गेल्याने या रस्त्यांसाठी खर्च केलेला करोडो रुपयांचा निधीही खड्ड्यात गेला आहे. हे रस्ते त्वरीत दुरूस्त करावे तसेचं रस्ता निकृष्ठ बनवणा-या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्वाभीमान संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूचं राहणार असल्याचे उपोषणकर्ते व संघटनेचे जिल्हाअध्यक्ष जितेश पाटील यांनी सांगितले.