उत्तर प्रदेश वरून पाॅझीटिव्ह रूग्ण थेट वाड्यात / शहर धोक्यात / लाॅकडाऊनचा फज्जा /Mashal Channel-1025

उत्तर प्रदेश वरून पाॅझीटिव्ह रूग्ण थेट वाड्यात / शहर धोक्यात / लाॅकडाऊनचा फज्जा /Mashal Channel-1025

वाडा शहर धोक्यात लाॅकडाऊनचा फज्जा दि. १४ मे रोजी वाडा शहरातील दोघांचा व तालुक्यातील एका मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यातील दोन व्यक्ती जिल्ह्याबाहेर तर एक व्यक्ती थेट उत्तर प्रदेश येथून आली होती. जिल्हाबंदी असतानाही दुसऱ्या जिल्ह्यातून व परराज्यातून हे वाड्यात आलेच कसे? असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे . दरम्यान सिद्धेश्वर रोड , अंजनीनगर व गो-हा हा विभाग प्रतीबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यांच्या निकटच्या १५ सहवासीतांना होम काॅरन्टाईन करण्यात आले आहे. या व्यक्ती कुणाच्या संपर्कात होत्या? याचा शोध सुरू आहे. १० मे रोजी ११ रिपोर्ट पाठवलेत होते यांच्यापैकी ८ रिपोर्ट येणे बाकी आहेत. • पालघर जिल्ह्यातील रूग्ण संख्या ३१३ झाली असुन आज एका रूग्णाचा मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या १५ झाली आहे. • पत्रकार शरद पाटील M-९८६७०१११०० (दि.१४/५/२०२०) Mashal News Network