गुरेढोरे चोरणारी टोळी जेरबंद ! पालघर जिल्ह्यात गुरे चोरणारे मोठे रॉकेट!

गुरेढोरे चोरणारी टोळी जेरबंद ! पालघर जिल्ह्यात गुरे चोरणारे मोठे रॉकेट!

पोलिसांच्या वाहनांना ठोकर मारून भरधाव वेगात पोलिसांच्या वाहनाला गुंगारा देत पळून जाण्याचा यशस्वी ठरलेल्या गो तस्करांच्या मुसक्या मनोर पोलिसांकडून आवळण्यात आल्या आहेत.पाठलाग करून मनोर पोलिसांनी तीन गो तस्करांना ताब्यात घेतले आहे.तसेच एक टन गोमांस जप्त केले आहे.रविवारी पहाटे सात वाजताच्या सुमारास मनोर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.कारवाई दरम्यान जप्त केलेल्या कार मधून दोन जिवंत बैल आणि पीक अप टेम्पो मधून गोमांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारवाई पथकात मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदीप कसबे यांच्या नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक अजित कणसे यांच्यासह मनोर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. गुरे चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केल्याबद्दल नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होते, मात्र अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचे गोधन चोरीला जात आहे, मनोर पोलिसांसारखी जिल्ह्यातील सर्वच पोलिसांनी आदर्श घेत नाकाबंदी केली तर गोरे चोरणऱ्या टोळीचा बंदोबस्त होऊ शकतो असे नागरिकांकडून चर्चिले जाते