घोडबंदर॥तीन दिवस जुना वरसोवा पुल बंद राहणार, वाडा-भिवंडी महामार्गाची मात्र डोकेदुखी वाढणार ?

घोडबंदर॥तीन दिवस जुना वरसोवा पुल बंद राहणार, वाडा-भिवंडी महामार्गाची मात्र डोकेदुखी वाढणार ?

मुंबईकडे येण्या जाण्याकरिता नेहमीच डोकेदुखी ठरत आहे तो हाच घोडबंदर रोड कधी नवीन पुलाचे काम सुरू असताना अडथळा निर्माण तर कधी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे ट्राफिक जॅम होते. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भाईंदर खाडीवरील जुना वरसावे पुल शनिवार ३० ऑक्टोबर ते सोमवार १ नोव्हेंबर या कालावधीत दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. पुलावरील केवळ एकच लेन सुरू राहणार असून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे हलक्या वाहनांना दुसऱ्या लेनवरून सोडण्यात येतील. खरं म्हणजे अवजड वाहतुकीने करिता या बंद लेन मुळे पर्यायी रस्ता म्हणून पाहिले जात असेल तर ते मनोर वाडा भिवंडी महामार्ग कारण यापुर्वीही अवजड वाहनांकरिता पर्यायी रस्ता म्हणून मनोर वाडा भिवंडी महामार्गावरुन अनेकवेळा ट्राफिक वळवण्यात आले होते परंतु यंदा हा मनोहर वाडा भिवंडी महामार्ग आधीच पूर्णपणे खराब असल्याने स्थानिकांना डोकेदुखी ठरत आहे व अनेक अपघात होत आहेत तर केवळ मातीचा खड्ड्यांमध्ये भराव केल्याने मानवनिर्मित धुळीचे धुके या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. आता त्यातच जर तीन दिवस वर्सोवा पूल बंद असल्याने या मनोर वाडा भिवंडी मार्गे अवजड वाहने वळवलीतर आणखी हा महामार्ग धोकादायक बनेल व आणखी प्रवासी नागरिकांना डोकेदुखी वाढेल.