#पाथरी तालुक्यातील हादगाव पाटीवर ट्रेक्टर व मोटर सायकल चा आपघात एक ठार एक गभींर जख्मी

#पाथरी तालुक्यातील हादगाव पाटीवर ट्रेक्टर व मोटर सायकल चा आपघात एक ठार एक गभींर जख्मी

#पाथरी तालुक्यातील हादगाव पाटीवर ट्रॅक्टरच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न दुचाकीस्वाराचा जीवावर बेतला आहे. पाथरी तालुक्यातील हदगाव पाटीजवळ ट्रॉलीमध्ये दुचाकी अडकून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना आज दिनांक 2 एप्रिल शनिवार रोजी घडली. अमोल बालासाहेब काळे असे मूर्त युवकाचे नाव आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सदरील अपघात घडला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. #जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी येथील अमोल बाळासाहेब काळे, युवराज विष्णू काळे हे दोघेजण घनसावंगी येथेन दुचाकी क्रमांक एम एच 21 ए यु 0888 वरून सकाळी पाथरी मार्गे परभणी कडे जात होते. त्यांची गाडी पाथरी तालुक्यातील हादगाव पाटीजवळ मरडसगाव कडे जाणाऱ्या रस्त्या जवळ अली असता त्यांनी डबल ट्रॉली लावलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी मागीला ट्रॉलीखाली आडकली. यामध्ये अमोल काळे याचा जागीच मृत्यू झाला.तर अपघातामध्ये युवराज काळे जखमी झाला. अपघाताची माहिती पाथरी पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगनवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून जखमी युवराजा काळे याला उपचारासाठी पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.