अंबाजोगाई जवळील येल्डा घाटात झाला अपघात; जखमीत महिला, बालकांचा समावेश अंबाजोगाई - कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याकडे ऊस तोड कामगार घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्राॅली मुकुंदराज परिसरातील येल्डा घाटात पलटी झाली. या अपघातात ११ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला तर अन्य १५ जण गंभीर जखमी असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. आज शुक्रवारी (दि. ३०) सकाळी हा अपघात झाला. रस्त्यावरील खड्ड्यात आदळून ट्रॅक्टर हेडला ट्राॅली जोडणारा रॉड तुटून हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.