देवी तुळजा भवानी अवतार कथा रहस्य.. the story of tuljapur..#tulja_bhavani

देवी तुळजा भवानी अवतार कथा रहस्य.. the story of tuljapur..#tulja_bhavani

तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत. शहाजीराजे महाद्वार, तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर तुळजाभवानी मंदिर नाव: तुळजा भवानी मंदिर निर्माता: महामंडलेश्वर माराडदेव कदंब (कदम) जीर्णोद्धारक: शिवाजी महाराज देवता: तुळजा भवानी वास्तुकला: हेमाडपंथी स्थान: तुळजापूर, धाराशिव, महाराष्ट्र महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो.[१] इतिहास संपादन करा हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तुळजाभवानी संबंधित सर्वांत जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील ‘काटी’ येथे इ.स. १३९७ सालच्या शिलालेखात पहावयास मिळतो. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार १५३ पाळीकर भोपे कुळाकडे आहेत. वैशिष्ट्ये संपादन करा श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात. पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईया आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते. तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी ,श्री देवीच्या मंदिर मध्ये पारंपारिक पद्धतीने रंगपंचमी हा उत्सव साजरा होतो. काळभैरव भेंडोळी उत्सव काळभैरव भेंडोळी उत्सव हा जर वर्षी दिवाळीच्या नरकचतुर्दशी या वेळी स्थितीनुसार असतो , हा उत्सव पाहण्यासाठी हजोरो भाविक श्री तुळजाभवानी मंदिर मध्ये येतात. दसरा उत्सव श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील एक अदभूत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मुर्ती ही मंदिर परिसर मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखी मध्ये ठेवून मंदिर प्रद्क्षना करण्यात येते. भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात हा उत्सवा मध्ये लाखो भाविक सहभागी होतात. ग्रहण कालावधी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये ग्रहण काळात श्री देवीस सोवळ्यात आणि पांढऱ्याशुभ्र वस्त्रा मध्ये ठेवण्यात येते आणि साज शृंगार नसतो आणि ग्रहण कालवधी संपल्यावर श्री देवीस स्नान घातले जाते आणि पूजा करण्यात येते. #tulja_bhavani . . . #tuljapur . . . . . #kuldevi