खरोची ग्रामपंचायत समोर ग्रामस्थाचे चक्री उपोषण

खरोची ग्रामपंचायत समोर ग्रामस्थाचे चक्री उपोषण

------------------------------------------------------------ गेली ५० वर्ष वहिवाट करूनही त्या जागेची नोंद न केल्याने आणि रमाई आवास योजनेतून घरकुल मंजूर असताना बांधकाम करताना सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप करत इंदापूर तालुक्यातील खरोची गावचे कुमार बाबुराव साठे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज चक्री उपोषण सुरू केले आहे. गेली ५० वर्ष माझ्या वहिवाटीत असणाऱ्या जागेची नोंद करा, अशी मागणी ग्रामपंचायत कडे करून सुध्दा त्याची दखल घेतली नाही. रमाई आवास घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले असून ते बांधण्यात ग्रामसेवक सरपंच अडचणी निर्माण करत आहेत असा आरोप कुमार साठे यांनी केलाय. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत यांना निवेदन सादर केले आहे असे देखील त्यांनी सांगितले. आज उपोषणाला सुरुवात करूनही सरपंच, ग्रामसेवक, किंवा पंचायत समितीचे कोणतेही पदाधिकारी, अधिकारी यांनी दखल घेतली नाही. दरम्यान कुमार साठे यांनी यापूर्वी सुवर्णजयंती मधून शौचालय योजनेचा लाभ घेतला असून त्याच ठिकाणी सौचालय बांधले आहे त्यावेळी त्याचा नावावर नोंद नसताना शौचालय मंजूर करून ग्रामसेवक यांनी अनुदान कसे जमा केले हा प्रश्न निर्माण होत आहे. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामपंचायत नावाची नोंद नाही तसेच ग्रामसेवक कार्यालयात हजार नसतात अशी तक्रारही करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवीची करण्यात आली आहे. डिजिटल आणि प्रिंट माध्यमातील रायगडचे हक्काचे व्यासपीठ “रायगड माझा” 🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “रायगड माझा”च्या सोशल अकाउंट सोबत Facebook Page - Fb.com/raigadmajha1 YouTube Channel -    / raigadmajha   Website - www.raigadmajha.in