Title - Shiv Stuti Singer - Shubhangi Joshi Copyrights - Bhakti Vision Entertainment Lyrics - कैलासराणा शिव चंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटीं झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥ रवींदुदानावल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमीरौघ जाळी । ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥ जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची । पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥ वैराग्य योगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी । उमानिवासा त्रिपुरान्तकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥४॥ उदारमेरु पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा । दयानिधी तो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥५॥ ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत । गंगा शिरी दोष महविदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥६॥ कपूरगौरी गिरीजा विराजे । हळाहळें कंठ निळाच साजे । दारिद्र्य दुःख स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥७॥ स्मशानक्रीडा करिता सुखावे । तो देवचूडामणि कोण आहे । उदासमूर्ती जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥८॥ भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा । राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥९॥ नंदी हराचा हर नंदिकेश । श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश । सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१०॥ भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न । तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥११॥ इच्छा हराची जग हे विशाळ । पाळी रची तो हरि ब्रह्मगोळ । उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१२॥ भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र । विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१३॥ प्रयाग वेणी सकळा हराच्या । पदारविंदी वहाती हरीच्या । मंदाकिनी मंगल मोक्षकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१४॥ कीर्ती हराची स्तुती बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना । एकाग्रनाथ विष अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१५॥ सर्वांतरी व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता । अंकी उमा ते गिरिरुपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१६॥ सदा तपस्वी असे कामधेनु । सदा सतेज शतकोटी भानू । गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१७॥ कर्पूरगौर स्मरल्या विसावा । चिंता हरी जो भजकां सदैवा । अंती स्वहितसुचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१८॥ विरामकाळी विकळे शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर । चिंतामणी चिंतनि चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१९॥ सुखावसानीं सकळें सुखाची । दुःखावसानी टळती जगाचीं । देहावसानी धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२०॥ अनुहतशब्द गगनी न माय । तिचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगे करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२१॥ शांतिस्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे । भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२२॥ पीतांबरें मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणींची । श्रीवेददत्त दुरितान्तकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२३॥ जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंचीं तुटली उपाधी । शुद्धस्वरे गर्जती वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२४॥ निदान कुंभ भरला अभंग । पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग । गंभीर धीर सुरचक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२५॥ मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी । काशीपुरी भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२६॥ जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळा मालतिमाळ हातीं । प्रतापसूर्य शरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२७॥ अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनीं विकासे । नेई सुपंथे भवपैलतारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२८॥ नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जप रे शिवयंत्रमाळा । पंचाक्षरी ध्यानगुहा विहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२९॥ एकान्ति ये रे गुरुराजस्वामी । चैतन्यरुपी शिव सूखनामी । शिणलों दयाळा बहुसाळ भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३०॥ शास्त्राभ्यास नको व्रतें मख नका तीव्रें तपें ती नको । काळाचें भय मानसीं धरु नको दुष्टांस शंकू नका । ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥३१॥ LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE