Please watch: "The stock market workshop concluded on behalf of 'Nota Share Market" • The stock market workshop concluded on beh... ~-~~-~~~-~~-~ कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या मीरा बडवे, झरिना खान आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू किशोरी शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. दत्तमंदिर ट्रस्टच्या संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरव केला जातो, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुरस्कार सोहळयाचे यंदा तिसरे वर्ष आहे. सन्मानचिन्ह, रुपये २५ हजार रोख, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मंदिर वर्धापनदिनी १५ जून २०१७ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारांची निवड विश्वस्त नंदकुमार सुतार यांच्या समितीने केली आहे