Please watch: "The stock market workshop concluded on behalf of 'Nota Share Market" • The stock market workshop concluded on beh... ~-~~-~~~-~~-~ तुरीला योग्य भाव मिळण्यासाठी शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून तूर व तूर डाळींचे भाव किफायतशीर व स्थिर राहावेत यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्यातील तुरीच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून आतापर्यंत 40 लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.आणखी 10 लाख क्विंटल तूर खरेदी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चांगले पर्जन्यमान आणि राज्य शासनाच्या विविध उपाययोजनांमुळे राज्यात सन 2016-17 मध्ये 15.33 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी होऊन एकूण 203 लाख क्विंटल एवढे भरघोस उत्पादन झाले. सन 2015-16 या वर्षीच्या (44 लाख क्विंटल) तुलनेत यंदा पाच पट अधिक उत्पादन झाले आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील तुरीचे भाव घसरल्यामुळे शासनाने तातडीने राज्यातील 323 खरेदी केंद्रांवर तूर खरेदीची सुविधा निर्माण केली. किंमत स्थिरता निधी अंतर्गत किमान आधारभूत दराने 15 डिसेंबर 2016 पासून नाफेड, एफसीआय व एसएफएसीच्यावतीने पणन महासंघ, विदर्भ पणन महासंघ, आदिवासी विकास मंडळआणि महाएफपीसी या संस्थांमार्फत तूर उत्पादक जिल्ह्यांमध्ये तुरीची खरेदी सुरु करण्यात आली होती.