: टीप : असं हे तयार करून ठेवलेले मिक्स्चर ६ महिने ठेवले तरी छान टिकते.यातील धान्य चांगले भाजलेले असते. म्हणून किड लागत नाही. याच मीक्सरचा उपयोग रस्सा भाजीसाठी करतात.याच्याने भाजीची चव तर वाढतेच आणि टेक्सचर ही खूप छान येते. मटण चिकन, अंडाकरी अंड्याचं खळगुटबोबींल,फिशकरी,मिसळीसाठी करी करतो त्या साठी,खूप मोठ्या प्रमाणात पुरणपोळी बरोबर करतो त्या कटासाठी,(आमटी) सांबार इतर रस्यांच्या भाजी मध्ये आपण टाकून प्रत्येक रेसीपी चटकदार आणि चमचमीत बनवता येते. आणि मग खा आणि लूटा खरी मजा.प्रत्यक्ष करून खावून बघा. एकदा करुन एका बरणीत भरून ठेवा. रस्याच्या थिकनेस नुसार वापरा. साहित्य : १) १ वाटी हरभरा डाळ २) १ वाटी गहू ३) १ वाटी तांदूळ ४) १ वाटी बाजरीट रस्याच्या थिकनेस नुसार पाण्यात पेस्ट करू न टाकायची याला येसूर किंवा कणीदार मसाला म्हणतात.