#mazyanavaryachibayako #abhijitkhandkekar #rashikasunil #ruchirajadhav #zeemarathi #anitadate माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून शन्या म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील पुन्हा एकदा एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. पण सिनेमाची ऑफर किंवा हेल्थ किंवा पर्सनल रिजनसाठी नाही तर मालिकेतल्या कथानकानुसार एक्झिट करत असल्याची चर्चा आहे. हे पात्र आधीच्या बॉयफ्रेंडसोबत परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे शनाया म्हणजेच रसिका सुनील लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारले होते. त्यानंतर रिअल लाईफमध्ये ती शिक्षणासाठी परदेशात गेली आणि शनायाची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकरली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मालिकेत रसिकाची एण्ट्री झाली होती. तर तुम्ही रसिकाला मिस करणार का...