अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घ्या, फडणवीसांची परमबीर सिंगच्या पत्रावरून मागणी ।Parambirsingh​

अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घ्या, फडणवीसांची परमबीर सिंगच्या पत्रावरून मागणी ।Parambirsingh​

#SachinVaze​ #Parambirsingh​ #DevendraFadanavis अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घ्या, फडणवीसांची परमबीर सिंगच्या पत्रावरून मागणी ।Parambirsingh​ सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी झालेल्या परमबीर सिंग यांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारा एक मोठा गौप्यस्फोट माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. दरम्यान, परमबीर सिंग यांच्या कारनाम्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचं पवार यांनी पत्रात म्हटलं आहे. यावरुन आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सरकारवर गंभीर टीका केली जात आहे.मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही यावेळी भाजपकडून केली जात आहे. भाजपकडून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. माजी मृख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परमबीर सिंह यांचे पत्र धक्कादायक आणि खळबळजनक, डीजी रँकच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. ज्याप्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. Follow us for more latest updates : Website:- Facebook:-   / hpnmarathi   Twitter:- https://twitter.com/home Instagram:-   / hpn_marathi_news   Download HPN News Android App: https://play.google.com/store/apps/de... Whats App:- +91 8007000071