रोपवाटिका भात रोपे लागवडीस तयार

रोपवाटिका भात रोपे लागवडीस तयार

रोपवाटिका भात रोपे लागवडीस तयार पालघर जिल्ह्यात पावसाचे उशिरा आगमन झाल्याने शेतकरीवर्गाने भात लागवडीचे नियोजन केले आहे. या भात लागवडीला कृषि यांत्रिकीकरणाची जोड मुळे आज भात लागवडी करिता वेळेवर रोपे लागवडीस तयार केली आहेत याची पाहणी कृषि संजिवनी 25 जुन ते 1 जुलै 2023 मोहिम अंतर्गत दिलीप झेंडे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी पालघर तालुक्यातील कमारे येथे कौशिक सावे यांच्या रोपवाटिकेस भेट दिली. दिलीप झेंडे यांनी क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांना लागवडीचा खर्च कमी करून जास्तीत जास्त भाडेतत्त्वावर भात लागवडीचे नियोजन करण्यास सांगितले व केलेल्या कामाचे समाधान व्यक्त केले.सोमटा येथे शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला व त्यांच्या अडचणी समजवून घेवुन त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.सोमटा येथील रमेश शांताराम तांबडा यांच्या मग्रारोहोयो अंतर्गत मोगरा लागवडीची पहाणी केली व शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर जास्तीत जास्त मोगरा लागवडीसाठी आवाहन केले. सदर कार्यक्रमास जि.प. सदस्य प्रतिभा गुरोडा, अंकुश माने विभागीय कृषी सह. संचालक कोकण विभाग ठाणे, निलेश भागेश्वर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पालघर,तरुण वैती तालुका कृषि अधिकारी पालघर,अजय हुले, मंडळ कृषी अधिकारी, अनिल नरगुलवार, मकृअ मनोर, जान्हवी पारधी, श्रीमती रिचा संख्ये, क्षेत्रीय अधिकारी श्री. सोमनाथ तमनार, हेमंत अधीकारी, सपना पिचड, कुशल ठोकले, कर्मचारी उपस्थित होते.