#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics दोन खोल्यांचं घर त्यात दोन ट्युबलाईट, 2 फॅन, फ्रिज आणि वॉशिंग मशिन पण तेही लॉकडाऊनच्या काळात बंद तरी वीज बिल 53,410.. धारावीत फॅक्टरी असलेला छोटा उद्योजक, लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे काम बंद, कमाईच झाली नाही पण वीज बिल मात्र 50 हजारांच्या घरात.. ही स्थिती आहे मुंबईतल्या धारावीतली मागच्या आकरा महिन्यात काही कमावलंच नाही, 53 हजारांचं बिल द्यायचं कुठून असा प्रश्न महोम्मद झैगन अन्सारी यांना पडलाय. गारमेंट फँक्टरी असलेले तसौर अली अन्सारी यांची फॅक्टरीही लॉकडाऊनच्या काळात पूर्ण बंद होती, मग इतकं बिल आलं कसं असाच प्रश्न त्यांनाही पडलाय. धारावीच्याच अब्दुल हसन यांची तर कोरोनामुळे नोकरीही गेली. त्यात हातात 24 हजारांची वीज बिल पडलं. मग घरातले दागिने गहाण ठेऊन थोडे पैसे भरलेत, उरलेले आणायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. वाढीव वीज बिलाविरोधात जनतेत असंतोष आहे. यवतमाळमध्ये तर लोकांनी वीज बिलाची होळी केली. पण याचं फलित काय हा प्रश्न आहेच. मुळात कोरोनामुळे सगळं बंद असताना सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलीय. त्यात सरकार तरी दिलासा देईल अशी आशा लोकांना होती,पण वाढीव वीज बिल भरावंच लागणार या ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेनंतर आता यांच्या समोर न संपणारे मोठे प्रश्न उभे राहिलेत. --------- इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak