राज्यात करोनाची तिसरी लाट २ आठवड्यांत? महाराष्ट्र टास्क फोर्सचा इशारा

राज्यात करोनाची तिसरी लाट २ आठवड्यांत? महाराष्ट्र टास्क फोर्सचा इशारा

#thirdwave #coronavirus #covid19 #taskforce राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील निर्बंध आता शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे परत एकदा अचानक गर्दी वाढू लागली आहे. ही गर्दी बघता पुढील २ ते ४ आठवड्यांत राज्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते.महाराष्ट्र टास्क फोर्सने हा धोक्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांतील जी मुले फारशी बाहेर पडत नाहीत, त्यांना या लाटेचा फारसा धोका नसल्याचा अंदाजही व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्या लाटेच्या अंदाजाबाबत बैठक झाली. या बैठकीत टास्क फोर्सचे सदस्य, आरोग्य विभाग आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. टास्क फोर्सच्या अंदाजानुसार, तिसऱ्या लाटेदरम्यान बाधितांची संख्या ही दुसऱ्या लाटेतील संख्येच्या दुप्पट होऊ शकते. तिसऱ्या लाटेचा स‌र्वाधिक धोका हा उच्च किंवा मध्यम मध्यमवर्गीयांना फारसा नाही. याउलट तो निम्न मध्यम वर्गाला (लोअर मिडल क्लास) अधिक आहे. पहिल्या दोन लाटांमध्ये हा वर्ग प्रादुर्भावापासून दूर राहिला. त्यामुळे त्यांच्यातील अॅन्टीबॉडिजचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेच्या तुलनेत दुप्पट नागरिक बाधित होण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त करण्यात आली.