प्रश्न १. चूक की बरोबर ते सकारण सांगा. (अ) भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. (आ) पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. (इ) देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे. (ई) ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे. (उ) भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे. प्रश्न २. थोडक्यात उत्तरेलिहा. (अ) ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात? (आ) ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गांच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत? (इ) कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे? प्रश्न ३. खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक क याठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिक वेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा. (ई) मनमाड (iv) प्रमुख रस्ते मार्ग (v) ४०° पश्चिम रेखावृत्त प्रश्न ५. भौगोलिक कारणेलिहा. (अ) ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. (आ) ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही. (इ) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झाले आहे. (ई) देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरताे. (उ) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते. प्रश्न ६. फरक स्पष्ट करा. (अ) ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक (आ) ब्राझीलमधील संदेशवहन व भारतामधील संदेशवहन (इ) भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ प्रश्न ७. टिपा लिहा. (अ) आधुनिक संदेशवहन (आ) भारतातील हवाई वाहतूक (इ) प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक (ई) प्रमाणवेळेची उपयोगिता पहा बरे जमते का ? प्रारंभी ब्राझील हा देश अवकाश संशोधनासाठी संयुक्त संस्थाने या देशावर अधिक अवलंबून होता, परंतु अलीकडे चीन, भारत, रशिया आणि युक्रेन या देशांचे सहकार्य घेत आहे. Ø देशात किती प्रमाणवेळा असाव्यात हे तुम्ही कशाच्या आधारेठरवाल? प्रश्न ४. योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट ‘ब’ गट (अ) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग (i) पर्यटन स्थळ (आ) रस्ते वाहतूक (ii) भारतातील रेल्वेस्थानक (इ) रिओ दी जनेरीओ (iii) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग उपक्रम : एखाद्या बंदराला/विमानतळाला/ संदेशवहन केंद्राला भेट देऊन त्याची माहिती लिहा. **