| Afternoon news 12pm | Afternoon Update 12pm | | Maharashtra1 news

| Afternoon news 12pm | Afternoon Update 12pm | | Maharashtra1 news

दुध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस... विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आज पुन्हा होणार वैठक... तोडगा निघण्याची शक्यता लोकसभेत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल.... शुक्रवारी चर्चेनंतर होणार मतविभाजन कोण म्हणतो, आमच्याकडं संख्याबळ नाही, सोनिया गांधी गरजल्या, अविश्वास प्रस्ताव आम्ही जिंकू, सोनिया गांधीनी व्यक्त केला विश्वास बळीराजा जलसंजीवनी योजनेला केंद्राची मान्यता.... महाराष्ट्रातील तीन लाख सत्यात्तर हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार.. नितीन गडकरींची माहीती औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न एक महिन्यात निकाली काढा, नाही तर महापालिका बरखास्त करू, मुख्यमंत्र्यांनी दिला दम परळीत मराठा क्रांतीच्या ठोक मोर्चाचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या, आरक्षण मिळाल्याशिवाय जागेवरून हलणार नाही, मराठा क्रांती मोर्चानं दिला इशारा गेल्या तीन दिवसापासुन महाराष्ट्रात दुध उत्पादकांचं आंदोलन सुरू आहे्... दुधाचे दर वाढवून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने त्यात लक्ष घालावे, अशी मागणी लोकसभेत शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, यांनी केली. मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारने रेंगाळत ठेवला आहे.मराठा तरुणांनी चार वर्षे संयम दाखवला आहे. संयमाने मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. आता त्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, त्यांचा अंत बघू नका, विरोधी पक्षनेता धनंजय मुंढे यांनी विधान परिषदेत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारची कोंडी केली