वसई पुरवठा विभागात वाढली नागरिकांची गर्दी. ४५ दिवसात ऑनलाईन घरबसल्या रेशन कार्ड मिळवा, वसई तहसीलचा स्तुत्य उपक्रम. वसईच्या पुरवठा विभागात रेशन कार्डसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ही गर्दी वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे शासनाची आयुष्मान भारत योजना.आयुष्मान कार्डसाठी रेशन कार्ड अनिवार्य असून, ते ऑनलाईन असणं आवश्यक आहे. प्रशासनाने शिक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम नागरिकांना Rcms.mahafood.gov.in पोर्टलवरून घरबसल्या रेशन कार्डसाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. वयोवृद्ध, विधवा आणि दिव्यांग नागरिकांसाठी शासनाच्या खिडकी योजनेअंतर्गत टोकन घेऊन मोफत रेशन कार्ड सुविधा उपलब्ध आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी अर्ज स्वीकारले जात आहेत. #sindhuprabhat #vasai #tahsildar #pepole #trending #breakingnews #election #maharashtranews #reels #reelsinstagram #instagram #viral #trending #explore #explorepage #instagood #fyp #love #reelitfeelit #trendingreels #tiktok #reelsvideo #foryou #fashion #instadaily #like #photography #reel #viralreels #india #follow #viralvideos #memes #instagramreels #followforfollowback #music #trend #instareels