🔅♻ पिंपरी चिंचवड महानगरपालिका 🔅♻🔅 स्वच्छ सर्वेक्षण 2025 ♻🔅 दैनंदिन अहवाल – ह क्षेत्रीय कार्यालय दिनांक: 20/01/2026 झोन: ह क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक: 20 ठिकाण: छत्रपती शाहू महाराज प्राथमिक शाळा, कासारवाडी आयोजक संस्था: पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बेसिक्स टीम एकूण उपक्रमांची संख्या: 01 राबविण्यात आलेल्या IEC उपक्रमाचे नाव: पथनाट्याद्वारे पाच प्रकारे कचरा विलगीकरण व स्वच्छ सर्वेक्षण 2025 जनजागृती अभियान एकूण सहभागी संख्या: 50+ उपस्थित कर्मचारी तपशील: • बेसिक्स टीम सदस्य: 4 सहभागी शासकीय अधिकारी/कर्मचारी: • आरोग्य निरीक्षक • आरोग्य मुकादम • बेसिक्स टीम सदस्य • पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी कार्य: छत्रपती शाहू महाराज प्राथमिक शाळा, कासारवाडी येथे पथनाट्याच्या माध्यमातून पाच प्रकारे कचरा विलगीकरणाची माहिती देण्यात आली. ओला, सुका, धोकादायक, ई-कचरा व सॅनिटरी कचरा वेगवेगळा ठेवण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना व उपस्थित नागरिकांना समजावून सांगण्यात आले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत स्वच्छता राखणे, परिसर स्वच्छ ठेवणे व सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करण्यात आली. उपक्रमाचे उद्दिष्ट: विद्यार्थी व नागरिकांमध्ये कचरा विलगीकरणाची सवय लावणे, स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2025 यशस्वी करण्यासाठी जनसहभाग वाढवणे. निष्कर्ष: पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये कचरा विलगीकरणाबाबत सकारात्मक बदल दिसून आला असून स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. ☘️ "आज स्वच्छता, उद्या उज्ज्वल भविष्य!" ☘️