श्री तुळजाभवानी मंदिर|तुळजापूर संपूर्णदर्शन#tuljabhavani #tuljabhavani_mandir #tuljapur

श्री तुळजाभवानी मंदिर|तुळजापूर संपूर्णदर्शन#tuljabhavani #tuljabhavani_mandir #tuljapur

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर-: धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टान्त देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते. भविष्य दर्शविणारा दगड-: येथील भविष्य सांगणारा दगड प्रसिद्ध आहे.त्यासाठी तुम्हाला दगडावर हात ठेवावे लागतात.तुमचे इच्छित काम होणार असेल तर तो उजव्या बाजूला फिरतो जर नसेल होणार तर डाव्या बाजूला फिरतो आणि खूप प्रयत्न करावे लागणार असतील तर तो दगड स्थिर राहतो अशी मान्यता आहे. कल्लोळ तीर्थ-: येथील कल्लोळ तीर्थामध्ये सर्व तीर्थक्षेत्रांचे तीर्थ सामावले आहेत त्यामळे याला विशेष महत्त्व आहे. गोमुख तीर्थ तसेच,उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक,श्री दत्त ,मल्हारी मार्तंड अशी अनेक देवस्थाने येथे मुख्य मंदिर परिसरामध्ये आहेत. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ #तुळजाभवानी #tuljabhvani #tuljapur #तुळजापूर #तुळजाभवानी_मंदिर #tuljabhavani_mandir #tuljabhavani_temple #sahyadrichya_paulkhuna #सहयाद्रीच्या_पाऊलखुणा ------------------------------------------------------------------------------- Like our pages : facebook :- https://m.facebook.com/sahyadrichyapa... instagram :-   / sahyadrichyapaulkhuna   Music provided by : http://teknoaxe.com