उडदाचे घुटे|Udadache ghute @Mayuri's Space

उडदाचे घुटे|Udadache ghute @Mayuri's Space

उडदाचे घुटे|Udadache ghute @Mayuri's Space साहित्य १ वाटी सालासकट उडदाची डाळ हळद हिरवा मसाला: १ चमचा जिरे २ चमचे खोबऱ्याचा किस ५ हिरव्या मिरच्या १५-२० लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा कोथिंबीर फोडणीसाठी: २ चमचे तेल १/२ चमचा जिरे पाव चमचा हळद मीठ ४ ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या कृती: प्रथम उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये हळद आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून डाळ शिजवून घ्यावे. एका तव्यात जीरे,खोबरे,हिरव्या मिरच्या,लसूण आणि आले टाकून.भाजून घ्यावे.भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यावे.त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्सर मधून बारीक करून घ्या.हा झाला हिरवा मसाला तयार. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेऊन गरम करा.तेल गरम झाल्यानंतर त्यात जीरे,हिंग,लसणाच्या पाकळ्या टाकून परतून घ्या.नंतर त्यात हळद आणि शिजवलेली उडदाची डाळ टाकावी.त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकावी आणि चवीनुसार मीठ घालावे.४-५ मिनिटे उकळी काढून गरम गरम उडदाचे घुटे तयार आहे. असे हे गरम गरम उडदाचे घूटे ज्वारीची भाकरी,कांदा आणि इंद्रायणी भातासोबत खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा Thank you 🙏🙏🙏 Mayuri's Space #उडदाचेघूटे #घूटे #Udadacheghute #उडदाचीआमटी #उडीद #udiddal