#हरभऱ्याचीभाजीरेसिपी #हरभऱ्याचीभाजी #हरभऱ्याचीहटवूनकेलेलीभाजी #हरभऱ्याचीभाजीमराठीरेसिपी हरभऱ्याचा सुका पाला वापरून ही पालेभाजी बनवता येते. त्यामुळे सोलाणे भरायच्या आधीचा पाला मिळाल्यास पुढील रेसिपी बनवता येईल. साहित्य: २ कप हरभऱ्याचा कोवळा पाला १/२ वाटी मटार (ऐच्छिक) १ टेस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद ४ लसूण पाकळ्या 2 चमचे लाल तिखट 3 २-३ चमचे भाजलेले बेसन पीठ किंवा थालीपीठ भाजणी घालावी. कृती: १) हरभऱ्याचा पाला स्वच्छ धुवून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यात लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या घालाव्यात. लसूण लालसर झाली कि मोहोरी, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी. २) आच मंद करून कढईवर झाकण ठेवून अर्धवट शिजू द्यावे. नंतर चिरलेला पाला घालून मध्यम आचेवर भाजी परतावी. ३) भाजी आळली कि मीठ आणि घालावी. टीप: १) पाल्याचीसुद्धा भाजी छान लागते. २) भाजीमध्ये लसूण नक्की घालावे.