स्वच्छतेकडून समृद्धीकडे हा लघुपट दिनांक 25 जून 2020 गुरुवार ला सायंकाळी 7:30 , वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झाला आहे . शासनाच्या स्वच्छ भारत मिशनला हातभार लागावा आणि आणि सर्वांचा आरोग्य निरोगी रहावे , सुदृढ रहावे या उद्देशाने मी या लघुपटाची निर्मिती केली आहे. कारण आजही गावखेड्यात अनेक लोक उघड्यावर शौचास बसतात ,त्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु अनेकांची ही सवय सुटता सुटत नाही, यावर आधारित हा एक प्रबोधनपर लघुपट आहे . अतिशय विनोदी पद्धतीने. एका गंभीर विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न केला आहे . यामध्ये यवतमाळ येथील लोककलावंत गजानन वानखडे , ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ भगत , विलास भाऊ सुतार, सावित्रा ढोके वानखडे , डॉक्टर ललिता घोडे मॅडम , संजय माटे , महेंद्र गुल्हाने , वंदना ढवळे, रविंद्र विरकर , पियुष भोयर, पद्माकर दुरतकर, डॉक्टर उमेश सेता , माजी सैनिक ज्योतिषी अभ्यासक बाळासाहेब उर्फ खंडेराव पांडे, आणि सुनील आरेकर यांचेसह अनेक कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. 🙏🏻