AMBRNATH । अंबरनाथमध्ये पूर्ववैमनस्यातून  तरुणाची हत्या, पाच आरोपी गजाआड

AMBRNATH । अंबरनाथमध्ये पूर्ववैमनस्यातून  तरुणाची हत्या, पाच आरोपी गजाआड

अंबरनाथ :- जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका 21  वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीये. भाविक शिंदे असं या मयत तरुणाचं नाव असून या प्रकरणी पोलिसांनी 24 तासात  पाचही आरोपीना अटक केलीये सतीश कांबळे,ओमकार भारस्कर,सचिन मोरे,अमित सुरेंद्र सिंग,रोहित जगदाळे अशी या आरोपींची नावे आहेत . अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर परिसरातील शाळेजवळ मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.काल रात्री उल्हासनगर येथे राहणारा  भाविक हा मित्रांसोबत आंबरनाथ शिवमंदिर परिसरातील शाळेच्या परिसरात आला होता.याच दरम्यान या ठिकाणी सतीश हा आपल्या चार मित्रांसोबत तिथे पोहचला. या दोघांमध्ये चार दिवसांपूर्वी शुल्लक कारणावरून काही वाद झाले होते या वादाचा राग मनात धरून सतीश ने आपल्या चार साथीदारांसह भाविक वर धारदार शस्त्राने वार केले या हल्ल्यात भाविकाचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर सतीश व त्याचे चारही साथीदार त्या ठिकाणाहून पसार झाले याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या आरोपींचा शोध सुरू केला अखेर या उल्हासनगर क्राईम ब्रँच चार आरोपींना अटक करत अंबरनाथ पोलिसांच्या स्वाधीन केलं तर एका आरोपीला विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेत अंबरनाथ  पोलिसांच्या स्वाधीन केले चोवीस तासाच्या आत या पाचही आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय.