तुळजापूरातील नेवैद्य कुठलीही पूजा ही याथोचित पार पडली की देवाला नैवद्य दाखवण्याची प्रथा असते. तुळजापूर येथील तुळजाभवानीची पूजाही ही दररोज परंपरेप्रमाणे मनोभावे होत असते. त्यानंतर देवीला परंपरेप्रमाणे नैवेद्य दाखवला जातो. पहिली पूजा ही सकाळी 5ः30 वाजता मुख्य महंत करतात. त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधीतर्फे भाजी भाकरीचा नैवैद्य दाखवून नंतर करवीर संस्थांकडून आलेला दुध खिरीचा नैवैद्य दाखविण्यात येतो. अशाच प्रकारे परंपरेप्रमाणे देवीला पुरणपोळीचा, गोडभात, चटणी, पापड आणि कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवला जातो. मातेला काजू, बदाम यांचाहि भोग दाखवतात. नंतर मातेला पाणी पाजले जाते व पंचपानांच्या विड्याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच मातेला प्रथेप्रमाणे दही भाताचाही नैवेद्य मनोभावे दाखवितात. पण आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे देवीला मांसाहारी खारा नैवेद्य दाखवण्याची पण प्रथा आहे. खारा नैवेद्य दाखविण्याबाबत एक रोचक कथा पण प्रचलीत आहे. जेव्हा भवानीमातेने महिषासूर राक्षसाचा वध केला त्यावेळी अंतिम समयी त्याने मातेकडे दोन वर मागितले. एक म्हणजे महिषासूरचे नाव हे मातेच्या आधी घेतले जावे आणि त्याला आवडतो तो नैवेद्य त्याला दाखवण्यात यावा. त्याप्रमाणे मातेला महिषासूर मर्दिनी असे संबोधले जाते त्याच बारोबर मातेला जो खारा नैवेद्य दाखवला जातो तो तिच्या चरणांपाशी असलेल्या महिषासूराला दाखवला जातो. मातेला फक्त शाकाहारी नैवेद्यच दाखवला जातो. 🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏 Our Facebook Page: / tuljabhavanipujari Our Instagram page: / pujarituljabhavani Our YouTube channel: • सोमवार दिनांक 27/09/2021 आई तुळजाभवानीचे द... Online Puja booking has started: http://ambaihotel.com Contact: 9960893964/9028010403 Iraja fly fly fly..!! Iraja fly fly fly.!! Iraja fly fly fly.!! #tuljabhavanipujari #goddess #maharashtra #tuljapur #onlinepuja #onlinebookings #onlineprasad #mahapuja #devimaa #navarisaree #choli #pujasamagri #onlinepoojabooking #tuljabhavani #maatulja #tuljai #mata #jaimatadi #dailypooja #tuljabhavanimandir