#maharashtra41news माझे कुटुंब माझी जबाबदारी ' ही मोहीम मालेगाव तालुक्यात सुरू होणार ! तालुक्यातील नागरीकांना सहकाऱ्यांचे कृषिमंत्री ना.दादा भुसे यांचे आवाहन ... मालेगाव । संपूर्ण देशासह राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे . यावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यात दि . १५ सप्टेबर ते १० ऑक्टोबर व १४ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर या दोन टप्प्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवत आहे . मालेगाव शहर व तालुक्यात देखील सदर मोहिम राबविण्यात येणार असून यासाठी आपल्या घरी येणा - या आरोग्य पथकाला नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्ष , सामाजिक , धार्मिक संघटना पदाधिकारी , कार्यकर्ते , धर्मगुरू आदींनी सहकार्य करून यात सहभागी व्हावे असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले .