#kidssong #marathi #song #children #rhymes #bedukudya एक 'उडतं' बालगीत - मला उडत ने ना वार्या - Mala Udat Ne Na Waarya - Marathi Song - Marathi Balgeet - Bedook Udyaa तुम्हाला पण वाटतं की नाही उडावंसं? मग! किती मजा येईल आपल्याला असं वार्याबरोबर, ढगाबरोबर मस्त आकाशात फिरता आलं तर! या मुलीने हट्टच धरलाय बघा वार्याकडे. Enjoy this wonderful marathi kids song while you #dream of flying, whether as a kid or as a grown-up. Subscribe and enjoy more kids songs , rhymes and kids stories on Beduk Udya बेडूक उड्या चं हे नवं कोरं ताजं गाणं तुम्हा सगळ्यांसाठी. गीत, संगीत - अपूर्व ओक - Lyrics, Composition - Apurva Oka स्वर - केतकी भावे जोशी - Singer - Ketaki Bhave Joshi संगीत संयोजन, मिक्सिंग - अनिकेत दामले - Music Arrangement and Mixing - Aniket Damle रेकॉर्डिंग स्टुडिओ - विधी व्हॉईस Recording Studio - Vidhi Voice नियोजन - केतन पटवर्धन - Co-ordination - Ketan Patwardhan ऍनिमेशन - ऑरा इन्स्टिट्यूट - Animation - Aura Institute गाण्याचे शब्द: Poem / Lyrics मला उडत ने ना वाऱ्या या ढगांबरोबर साऱ्या मारीन मग आकाशामध्ये इकडून तिकडे फेऱ्या लांब लांब ते डोंगर पर्वत येईल तिकडे जाता रंगीत रंगीत इंद्रधनुष्य मिळेल का मज हाता गंमत जंमत सांगून येईन आकाशातील ताऱ्या खूप वाटते उंच उडावे पक्षांशी बोलावे जिथे वाटते तिथे फिरावे नवे गाव शोधावे रंग मिळावे आकाशाचे चित्र नवे काढाया कुठे राहती कुठून येती कुठे कुठे ते जाती आणि अचानक अशी भयानक धड धड धड का करती विचारीन मी सारे सारे ढगांस काळ्या गोऱ्या हे गाणं तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तुम्ही बघा, आणि तुमच्या लहान मोठ्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा दाखवा बरं का !