जिवनात सर्वांनाच प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असते .कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्ती करत असताना मार्गदर्शक, दीपस्तंभ आवश्यक असतो .आज महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा या क्षेत्राविषयी आकर्षण निर्माण झालेले आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन पर भाषण व त्या भाषणामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अधिकारी होण्याची निर्माण झालेली आकांक्षा, जीवनात काहीतरी विशेष कामगिरी करण्याची धडपड यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे आकर्षण वाटते .नवनियुक्त अधिकारी मित्र त्यांना मिळेल त्या वेळेत मार्गदर्शन करतात परंतु हे मार्गदर्शन अपुरे पडते याचा विचार करून या क्षेत्रातील काही नामवंत मंडळींना एकत्र करून मी उत्तम पवार दि लॉयन ॲकॅडमी पुणे ची स्थापना केली आहे. या अकॅडमीची शाखा लातूर शहरात ही उपलब्ध आहे .या अकॅडमी मार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करताना येणाऱ्या अडचणी चा विचार करून योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा यासाठी लागणारी पात्रता, अभ्यास विषय याची माहिती दिली जाते . तसेच सर्व विषयाच्या स्वतंत्र बॅचेस उपलब्ध करून दिल्या जातात .यामध्ये राज्यघटना, अर्थव्यवस्था, इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल, मराठी, इंग्रजी ,गणित व बुद्धिमत्ता ,फौजदार कायदा (PSI Law), राज्यसेवा कायदा, विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, शारीरिक चाचणी आणि मुलाखत इत्यादी विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जाते. तसेच ज्या ग्रामीण भागातील मुलांना पुणे या ठिकाणी अभ्यासाकरिता येणे परवडत नाही अशा विद्यार्थ्यांना The Lion Academy यूट्यूब च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा व यशाची प्राप्ती होण्यासाठी सखोल माहिती उपलब्ध करून दिली जाते .तसेच चालू घडामोडी चे विशेष माहितीपर व्हिडिओ या यूट्यूब चैनल वर उपलब्ध करून दिले जातात. सरळ सेवेच्या परीक्षा बद्दल ही विद्यार्थ्यांमध्ये असणारी उत्सुकता जाणून त्यामध्ये यशप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना पात्र बनवले जाते. गृहिणी, नोकरदार वर्ग यांच्यासाठी Weekend बॅचेस ची व्यवस्था ही अकॅडमी मार्फत केली जाते. दि लॉयन ॲकॅडमी मध्ये शिकवणारे सर्व गुरुवर्य स्पर्धा परीक्षेशी संबंधित गाढा अनुभव असणारे व त्यांच्या विषयात सखोल ज्ञान असणारे आहे .सर्वात महत्त्वाचे सर्व शिक्षक वृंद ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागातील मुलाविषयी प्रामाणिक तळमळ ,विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची धडपड ,प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असणारे ज्ञान देण्याची वृत्ती त्यांच्या अंगी आहे .ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच या क्षेत्रात कमी वेळेमध्ये यश मिळवायचे आहे त्यांच्यासाठी दि लॉयन ॲकॅडमी एक मैलाचा दगड असेल. दि लॉयन ॲकॅडमी पुणे Telegram Channel Link https://t.me/MPSCLION दि लॉयन ॲकॅडमी पुणे App download Link http://on-app.in/app/home?orgCode=ptvjn Contact No 9090757583/9518788364 Academy Adress 1)चिंतामणी कॉम्प्लेक्स, न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर, टिळक रोड ,सदाशिव पेठ ,पुणे 2)दि लॉयन ॲकॅडमी, हॅपी हाऊस समोर, गांजवे चौक ,LBS रोड , पुणे Telegram The Lion Academy ✍Get Inspired,Get Motivated...Road Towards Success.! :v:प्रा.उत्तम पवार (PSI,ना.तहसिलदार)