मालेगांव आयुक्त कोरोना मुक्त,आयुक्त श्री.दीपक कासार यांचे मनोगत..

मालेगांव आयुक्त कोरोना मुक्त,आयुक्त श्री.दीपक कासार यांचे मनोगत..

#maharashtra41news सविस्तर बातमी पहा/वाचा मालेगांव महानगरपालिका आयुक्त कोरोना मुक्त,कोरोना मुक्त झाल्याबद्दलआयुक्त श्री.दीपक कासार यांचे मनोगत ◆◆◆◆◆◆● जनसंपर्क विभाग, मनपा मालेगाव. दि.22/5/2020 ::प्रेसनोट:: मा. मनपा आयुक्त दिपक कासार यांचे मनोगत..... कोरोना शी लढताना.... प्रिय मालेगावकरांनो,                                               आपण सगळेजण सध्या कोरोना सारख्या महामारीतुन जातो आहोत. कोरोनावर अद्याप लस सापडली नाही़ त्यामुळे सध्यातरी त्यासाठी घेण्यात येणारी काळजी हाच त्यावरील प्रभावी उपाय आहे. गेल्या आठवड्यात मला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतरच्या माझ्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या असुन आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशिर्वादाने मी कोरोनाला पराजीत करू शकलो आहे. यासाठी काटेकोरपणे कॉरन्टाईनचे पालन, योग्य आहार, पुरेसा व्यायाम, काही औषधे व सकारात्मक विचार ही पंचसुत्री मी अवलंबली. या काळात मला कुटूंबाने, वरिष्ठांनी, मित्रांनी व अनेक मालेगावकरांनी धीर दिला हे सुद्धा माझ्यासाठी औषधच ठरले. मी बरा झालो असलो तरी मला याचे विशेष समाधान नाही, कारण जेव्हा सम्पूर्ण मालेगाव कोरोना मुक्त होईल त्या दिवशी मला अत्यानंद झालेला असेल, आपणा सर्वासह कोरोना मुक्त होण्यातच माझा आनंद सामावलेला आहे. आज मालेगाव मध्ये कोरोनाने उच्छाद मांडला आहे. मला वाटत आपण सर्वांनी माझ्या प्रमाणे सगळ्या नियमांचे पालन केले, पुरेशी काळजी घेतली तर आपण सगळेजण शंभर टक्के या आजारावर मात करू शकाल, या आजाराचा संसर्ग टाळु शकाल. आपण जर पुरेशी काळजी घेतली नाही तर आपली बेफिकीरी आपल्या, कुटूंबाच्या, जवळील मित्रांच्या, शेजाऱ्याच्या जीवावर बेतु शकते. जे आपले जीव की प्राण आहेत, ज्यांच्यासाठी आपण कष्ट करतो अशा जीवाभावाच्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी आपल्या सगळ्यांना काही दिवस काळजी घ्यावीच लागणार आहे. आजार झाल्यावर होणारा त्रास व संभाव्य धोक्या पेक्षा काळजी घेणे अगदीच सोपे आहे. डॉक्टर, नर्सेस, पोलीस, आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह आम्ही कितीही प्रामाणिकपणे व जीव धोक्यात घालून मेहनत घेतली तरी आपल्या सहकार्या शिवाय आपण या कोरोनाला हद्दपार करू शकणार नाही, या कोरोना विरुद्धच्या लढाईच यश-अपयश आपल्या मदतीवर अवलंबून आहे. मालेगाव ही श्रमीकांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची व उद्योजकांची भुमी आहे. आपण सर्वांनी जर एकदिलाने या कोरोनाची हकालपट्टी करण्याचा निर्धार केला, प्रशासनाकडुन देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन केले, योग्य ती काळजी घेतली तर येत्या काही दिवसात आपले मालेगाव पुर्वपदावर आलेले असेल याचा विश्वास बाळगा. आता या क्षणापासुनच आपण कोरोनाला पळवुन लावण्यासाठी कटीबद्ध होवु या. आपला स्रेहांकित दिपक कासार                     आयुक्त,                       मालेगाव महानगरपालिका मालेगाव.