नमस्कार मित्रांनो आज आपण जी रेसिपी करणार आहे ती म्हणजे झणझणीत कोथिंबीर पिठल तर मग चला सुरुवात करुया . साहित्य कोथिंबीर 2 वाटी लसूण पाकळ्या 8/10 हिरव्या मिरच्या 6 तेल 4 चमचे जीरे 1 चमचा मोहरी 1 चमचा कडीपत्ता पाने थोडी हळद 1/2 चमचा मीठ चवीनुसार थोडी कोथिंबीर पाणी 1 ग्लास कृती प्रथम मिक्सर भांड्यात कोथिंबीर, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या घालून वाटून घ्यावे, वाटन जास्त बारिक करु नये याची काळजी घ्यावी, फोडणी साठी कढाईत तेल गरम करून घ्या, तेल गरम झाल्यावर जीरे, मोहरी कडीपत्ता घालून चांगले परतून घ्यावे, मग कोथिंबीर चे वाटन,हळद घालून 2 मिनिटे परतून घ्यावे,आता पाणी घालून उकळी आणावी, उकळी आल्यावर हळूहळू बेसन घालून चांगले एकजीव करावे, एकजीव झाल्यावर झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढावी, आता आपली झणझणीत कोथिंबीर पिठल खायला तयार आहे. वेळात वेळ काढून तूम्ही ही रेसिपी बघितल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्हाला हि रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पाहा व तुम्हचा अनुभव मला सांगा . THANK YOU FOR WATCHING. LIKE AND SHARE.