नागपुरी स्पेशल झणझणीत डाळ कांदा- घरच्या साहित्यात भाजी | saoji dal kanda recipe | dal kanda recipe

नागपुरी स्पेशल झणझणीत डाळ कांदा- घरच्या साहित्यात भाजी | saoji dal kanda recipe | dal kanda recipe

#dalkandarecipe#saojidalkanda#vidarbharecipe Dal kanda is an authentic saoji style easy and simple recipe. This is an easiest way of making sabji with very few ingredients easily available at home. Ingredients: • 1 cup soaked Chana dal (soak it for 3-4 hrs) • 2 finely chopped Onions • 1 tsp Red chili powder • Salt to taste • 1 tsp Kanda lasun masala / homemade black masala / garam masala • 2 tbsp Oil • 1/2 tsp Mustard seeds • 1/2 tsp Cumin seeds • bay leaf • Ginger garlic paste • Turmeric powder and asafetida Method: • Wash the chana dal well and soak it in enough water for about 2- 3 hours. • Heat up oil in a pan. • Add mustard seeds and let them pop up. • Add cumin seeds and let them splutter add a pinch of asafetida. • Add bay leaves. • Fry the spices for a few seconds. • Add onion and ginger garlic paste and fry until ut gets nice golden color. • Add kanda lasun masala, red chili powder and mix well. • You can add goda masala, kala masala, varhadi masala or any stored masala in place of kanda lasun masala. • add turmeric powder and Add soaked dal , cook for few minutes . • Add some more water and salt to taste. • Mix well and cook on medium heat . • Dal kanda is already. • Dal kanda goes well with bhakari or poli or rice. नमस्कार मैत्रिणींनो, Lockdown मधेही भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडतेय. लोकं जीवावर उदार होऊन भाजीपाला, दुधासाठी गर्दीत उतरतायत. पण खरंच.. भाजीपाला, दुधासाठी खरोखर आपल्याला कुटुंबाची सुरक्षा पणाला लावायची गरज आहे का? लिस्ट करून महिनाभर पुरेल इतकं धान्य आणि इतर गोष्टी आणल्या की प्रसंगी कोंड्याचा मांडा करू, कोरा चहा पिऊ पण कुणीच घराच्या बाहेर पडणार नाही इतका संकल्प प्रत्येक घराने केला की झालंच की 😊 आणि कोंड्याचा मांडाच का? कितीतरी छान छान भाज्या, पदार्थ अगदी घरच्या साहित्यातून होतात की. स्वाद मराठी या माझ्या youtube channel वर lockdown संपेपर्यंत महिनाभर प्रत्येक दिवशी सकाळी 9 वाजता घरच्या साहित्यातून बनणारा छानसा भाजीचा प्रकार आणि संध्याकाळी 5 वाजता पूर्णान्न जेवणाचा (one dish meal) एक सोप्पा नाविन्यपूर्ण प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी youtube वर जाऊन swad marathi असं सर्च करा किंवा    / @swadmarathi1335   या लिंक वर क्लिक करा आणि स्वाद मराठीला subscribe करा म्हणजे त्या प्रत्येक रेसिपी चं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. काळजी घ्या मैत्रिणींनो रोहिणी आशिष Swad marathi Youtube channel भाज्यांची लिस्ट - 1) भरल्या कांद्याची भाजी 2) गट्टे की सब्जी 3) पेंडपाला 4) कढी गोळे 5) उडदाचं घुटं 6) पानगोळे 7) खान्देशी शेवभाजी 8) वड्याचं सांबार 9) हुलपल्ली 10) खळगुट 11) म्हाद्या 12) वालाची भाजी /बिरडं 13) कुळथाचं पिठलं 14) पातोडी रस्सा 15) शेंगदाण्याची आमटी 16) येसूर वडी 17) खडी दाल 18) मसूरचं खाट्टं 19) गुजराती सेव टोमॅटो भाजी 20) कैरीची उडद मेथी 21) रावण पिठलं 22) उंबराची आमटी 23) खान्देशी मिरच्यांची भाजी 24) दाल मखनी 25) मालवणी स्टाईल गोळ्यांची आमटी 26) बुंदीची कढी 27) मोडाच्या मटकीची भाजी 28) अक्खा मसूर 29) सांडग्याची भाजी 30) डुबुक वडी 31) सॊयाबीनच्या वड्यांची भाजी 32) काजुकरी 33) वाटण्याची /फ्रोझन मटारची भाजी 34) पंचमेल दाल 35) मासवडी रस्सा 36) भोकरी वरण 37) कुरडईची भाजी 38) डाळबट्टी 39) झुणका भाकरी 40) पंजाबी छोले 41) कांद्याची भरडा भाजी 42) डाळ कांदा 43) मोदकांची आमटी 44) कढी पकोडे 45) चणा मसाला 46) पापडाची भाजी 47) मोकळी डाळ 48) मुंगवड्याची भाजी 49) गट्टे का साग 50) मोडाच्या मेथीची भाजी 51) ढाबेवाली तडका दाल 52) तुरीचे लवट /कोफ्ते 53) मखाना मसाला 54) मोगर 55) शिपी आमटी 56) मेदगं 57) बाजार आमटी 58) सुकवलेल्या हरभरा पाल्याची भाजी 59) कनोरचे गोळे 60) झिरक 61) उडदाचं डांगर 62) काळ्या वाटण्याची भाजी 63) मोड आलेल्या हुलग्याची /कुळीथ भाजी 64) वाटाणे भिजवून आळण 65) खसखसची विदर्भ स्टाईल भाजी 66) कांदा भज्यांची रस्सा भाजी © swad marathi