Mk news channel mumbai: चौंडेश्र्वरवाडी गावठाणाची मोजणी करण्याची व तंटामुक्ती अध्यक्ष निवडीची मागणी

Mk news channel mumbai: चौंडेश्र्वरवाडी गावठाणाची मोजणी करण्याची व तंटामुक्ती अध्यक्ष निवडीची मागणी

चौंडेश्र्वरवाडी गावठाणाची मोजणी करण्याची व तंटामुक्ती अध्यक्ष निवडीची मागणी श्रीपूर/विजयकुमार कदम चौंडेश्र्वरवाडी गावठाणातील जागेवरून नागरिकांमध्ये सतत वाद होत आहेत.कारण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने अतिक्रमण झाले आहे.परंतु उदयनगर व चौंडेश्र्वरवाडी मधील बऱ्याच नागरिकांना घरकुल मंजूर असून देखील जागा नसल्याने त्याचा लाभ मिळत नाही.म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुजर,वैशाली लावं ड, राणी साकळकर, मोहिनी कांबळे,सुवर्णा ननवरे,शिला गायकवाड,यांनी गावठाणाची मोजणी करण्याची मागणी केली आहे.तसेच क्रांतीकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधीर भाऊ साठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्यक्ष गणेश भाऊ भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली माळशिरस तालुका सरचिटणीस उदयनगरचे चंदू कोळी यांनी तंटा मुक्ती अध्यक्ष निवडी बाबत मागणी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.