प्रश्न १. अचूक पर्यायांसमोरील चौकटीत ü अशी खूण करा. (अ) वस्त्यांचेकेंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते. (i) समुद्रसान्निध्य (ii) मैदानी प्रदेश (iii) पाण्याची उपलब्धता (iv) हवामान (आ) ब्राझीलच्या अाग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? (i) केंद्रित (ii) रेषाकृती (iii) विखुरलेली (iv) ताराकृती (इ) भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? (i) नदीकाठी (ii) वाहतूक मार्गांच्या लगत (iii) डोंगराळ प्रदेशात (iv) औद्योगिक क्षेत्रात (ई) नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते. (i) वनाच्छादन (ii) शेतीयोग्य जमीन (iii) उंचसखल जमीन (iv) उद्योगधंदे (उ) ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते? (i) पारा (ii) आमापा (iii) एस्पिरितो सान्तो (iv) पॅराना प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा. (अ) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. (आ) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. (इ) भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. (ई) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. (इ) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झालेआहे. प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा. (अ) भारत आणि ब्राझील या देशांचा नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. (अा) गंगा नदीचेखोरेआणि ॲमेझॉन नदीचेखोरे यांतील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. (इ) मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते? उपक्रम : इंटरनेट व संदर्भग्रंथांच्या आधारेब्राझीलमधील ‘पश्चिमेकडे चला’ व भारतातील ‘खेड्याकडेचला’ या धोरणांविषयी माहिती मिळवा. त्यांचेउद्देश व होणारेपरिणाम यांविषयी वर्गात चर्चा करा. *