'असे तळिराम त्यांना पहायची सवय',आमदार संजय गायकवाड यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर

'असे तळिराम त्यांना पहायची सवय',आमदार संजय गायकवाड यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर

बुलढाणा- बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय गायकवाड यांना तळिराम अशी टीका करत त्यांना कोरोनाचा विषाणु जर तोंडात टाकायचा असेल तर हँडक्लोज़ वापरावा आणि मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला होता.त्यावर आज बुलडाणा येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.ते माध्यमांना प्रतिक्रीया देत असतांना म्हणाले की, त्यांना कदाचित माहीत नसेल की माझी ती प्रतिक्रिया ही किती वाजता ची आहे, पाच वाजताची बाईट आहे, अन असे तळीराम त्यांना पाहण्याची सवय आहे त्यांच्या सोबतचे मंत्री लेडीज बारमध्ये डान्स पहायची सवय आहे, तसेच आम्हाला सल्ला देण्यापेक्षा केंद्र सरकारला सल्ला द्यावा असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांना संजय गायकवाड यांना दिले आहे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, ते नारायण राणेच बेंडुक काय ते नितेश राणे, त्या कोंबड्याला हे माहीत नाही, की आज आपण उद्धव ठाकरे साहेबांवर किती जहरी टीका करता, तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग तुमची का पूजा करायची असा सवालही संजय गायकवाड यांनी नितेश राणे यांना केला आहे. बाईट - संजय गायकवाड (शिवसेना आमदार,बुलडाणा)