Daily NCERT Science MCQ आनुवंशिक रक्तविकार हे रक्तातील घटकांचे स्वरूप किंवा कार्य नियंत्रित करणाऱ्या जनुकांमध्ये (genes) झालेल्या बदलांमुळे (mutation) होतात. हे विकार पालकांकडून DNA द्वारे मुलांकडे जातात. प्रमुख आनुवंशिक रक्तविकार असे आहेत: • Sickle Cell Anaemia (सिकल सेल अॅनिमिया): Hemoglobin जनुकातील mutation मुळे RBC कोयत्यासारखे (sickle-shaped) होतात. • Hemophilia (हिमोफिलिया): Clotting factor जनुकातील दोषामुळे रक्त गोठत नाही, दीर्घकाळ रक्तस्त्राव होतो. • Thalassemia (थॅलेसेमिया): Hemoglobin तयार करणाऱ्या जनुकातील mutation मुळे गंभीर अॅनिमिया होतो. हे आनुवंशिक विकार आहेत, तर मलेरिया हा Plasmodium परजीवीमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे, आनुवंशिक नाही. #thallassemia #sciencepyq #sciencencert