त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरात पंचगंगा नदीघाट परिसरात आज (8 नोव्हेंबर) पहाटे 51 हजार दिव्यांनी रोषणाई करण्यात आली होती. यानंतर सारा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता. कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे. पंचगंगा घाटावरील या दीपोत्सवाच्या निमित्ताने जणू सुंदर रांगोळ्यांचे प्रदर्शनच भरत असते. विविध लोककला, परंपरा, सामाजिक प्रश्न आणि कोल्हापूरची खासियत अशा विषयांवर यंदा रांगोळी बघायला मिळाल्या. Instagram► / being_sunbai