Tuljapur Chabina  | श्री तुळजाभवानी दर्शन । live darshan | श्री तुळजाभवानी लाइव्ह दर्शन |

Tuljapur Chabina | श्री तुळजाभवानी दर्शन । live darshan | श्री तुळजाभवानी लाइव्ह दर्शन |

Tuljapur Chabina | श्री तुळजाभवानी दर्शन । live darshan | श्री तुळजाभवानी लाइव्ह दर्शन | तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानीमातेचे भक्त मनोभावाने देवीची ज्योत पेटवून नेतात. तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील १५५४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २९९ कुटुंबे व एकूण १३९२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर तुळजापूर ११ किलोमीटर अंतरावर आहे येथील प्रेक्षणीय स्थळे काळभैरव:-- हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे. भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे. आदिमाया व आदिशक्ति:-- देवळाच्या मुख्य द्वाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ह्या देवता आहेत. घाटशीळ:-- डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आत देवीच्या पादुका आहेत. घाट्शीळवर उभारून देवीने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला. तेव्हा रामाने देवीला ओळखले व तो म्हणाला 'तू का आई?’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत. जवळच मंदिर संस्थानने बांधलेली बाग आहे. पापनाश तीर्थ:-- हे एक तीर्थ असून पापनाशिनी असे याचे प्राचीन नाव आहे. येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे. देऊळ जुने पण मजबूत आहे. रामवरदायिनी -येथे रामवरदायिनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सीतेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असताना या देवीने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवला. देवीच्या मुर्ती वर सुंदर नक्षी असुन डाव्या हाताच्या करंगळी ने रमला मार्ग धावले हे मुर्ती वर दिसुन येते. याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावाची पाण्याची ठिकाणे आहेत. भारतीबूवाचा मठ:-- देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो. याचे मूळ पुरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सारीपाट खेळत असे. मठ जुना, मजबूत व प्रेक्षणीय आहे. गरीबनाथाचा मठ:--हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे. नारायणगिरीचा मठ:-- हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत. सध्या हा येथील क्रांती चौकात आहे. मंकावती तीर्थ:--मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे. असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेही म्हणतात. यावर महादेवाची पिंड आहे. तसेच मोठे मारुती मंदिर आहे. धाकटे तुळजापूर:--येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव्य करते.