💐💐बुद्ध आणि त्यांचा धम्म💐💐 प्रथम खंड सिद्धार्थ गौतम.-बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग :१जन्म ते प्रव्रज्या उपभाग:१९ राजपुत्र आणि त्याचा सेवक नदी अनोमाच्या काठावर.. छन्न बोलतो सिद्धार्थाशी! माय बाप हे वाट पाहती..नकोस तोडू नाळ घरशी! कंथक घोडा तयार आहे.. परतुन चल ना कपिलनगरी राजवस्र हे नकोस त्यागू..ऐक अर्चना संसाराशी! सांग सांग रे मित्रा छन्ना.".बा राजाला अन् मातेला" दु:खाचे हे कारण बघण्या..निरोप घेतो आप्तजणाशी! छन्न म्हणाला,सिध्दार्थाला..अशी कशी रे सत्वपरीक्षा कुणास सांगू वियोग कैसा..बघवत नाही तनामनाशी! दिसला नाही करुणासागर.. किती आटल्या अश्रू धारा परतुन आला छन्न घराला..गेला गौतम वनाश्रमाशी! 💐 २ जुलै २०२३,सायंकाळी.५.०० वा आश्रम ले आऊट ,नागपूर बुद्ध धम्म ग़ज़लायन २८ ह्रदय चक्रधर