#radhikapte #marathiactress लय भारी अभिनेत्री राधिका आपटे हीच्या एका फोटोची तुलना चक्क बेडकासोबत झालीये। ही तुलना नेटक-यांनी केलेली नाही तर तिने स्वत तिची तुलना बेडकासोबत केलीये। फोटोंमध्ये राधिका आपटे हिने गुलाबी रंगाचं टॅक्सचर शर्ट परिधान केलाय. सोबतच नियॉन कलरचं स्ट्रॅप टॉप परिधान केलाय. बांधलेले केस आणि सुंदर हास्यासोबत राधिकाचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “प्रत्येक जण प्राणी असतो…मी बेडूक दिसतेय…आणि तुम्ही?” अशी कॅप्शन दिलीये। राधिका नेहमीच फोटोशूट करत असते तिचा फोटोतला अंदाज घायाळ करणारा असतो। पहा हे काही फोटो