#TourismPlacesMarathi #Nashik #NashikNews 00:05 परिचय 04:18 प्रेक्षनिय आणि धार्मिक स्थळे 04:26 हरिहर किल्ला 05:27 सर्व धर्म मंदीर तपोवन 06:21 मांगी तुगी मंदीर 06:50 पंचवटी 07:27 श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर 08:00 काळाराम मंदिर 08:39 श्री सप्तश्रृंगी गड 09:23 श्री सोमेश्वर मंदीर 09:58 रामकुंड 10:28 धम्मगिरी या शिवाय ह्या जिल्यात अनेक प्रेक्षनिय आणि धार्मिक स्थळे आहेत. तेथे पर्यटकांनी आवर्जून भेट द्यायला हवी. त्यामध्ये , कुशावर्त तिर्थ , तोफखाना केंद्र , नाणे संग्रहणलय अंजनेरी , गारगोटी खनिज संग्रहालय , पांडव लेणी , दादासाहेब फाळके संग्रहालय , दुधसागर धबधबा आणि दुगारवाडी धबधबा इत्यादी हे आहेत. नाशिक नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते. नाशिक गोदावरी नदीच्या काठावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी लेणी ही बौद्ध लेणी आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्ड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा एक नवीन विभाग वसवला आहे. पंचवटी हा सुद्धा नाशिकचा एक भाग आहे. नाशिकचे वर्णन "भारताची वाईन कॅपिटल" असे केले जाते, नाशिक भागात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त टन द्राक्षांचे उत्पादन होते. द्राक्षशेतीमुळे नाशिक भारताचे वाइन कॅपिटल म्हणून उदयास आले आहे. दर वर्षी येथे भरवल्या जात असलेल्या सुला फेस्ट या मद्य उत्सवाला मोठी गर्दी असते. नाशिकमधील अशी धार्मिक स्थळे पाहिल्याबरोबर माणसाला पुरातन काळाचे महत्त्व कळते. गोदावरी ही नदी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. शहराला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे.