झणझणीत डब्यासाठी शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी।Shevgyachya Shengachi Sukhi bhaaji | Drumstick Sabji

झणझणीत डब्यासाठी शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी।Shevgyachya Shengachi Sukhi bhaaji | Drumstick Sabji

#Kitchen's Queen Kitchens queen recipe अगदी चविष्ट आणि झणझणीत डब्यासाठी शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी । Shevgyachya Shengachi Sukhi bhaaji | Drumstick Sabji । Maharashtrian Recipes साहित्य : ३-४ शेवग्याच्या शेंगा दीड चमचा शेंगदाण्याचा बारीक कूट १ चमचा मोठा कूट १ बारीक चिरलेला कांदा १ टोमॅटो कोथिंबीर ,कडीपत्ता आले लसूण पेस्ट कृती : सर्वात प्रथम आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेऊया . त्यासाठी मी ३-४ शेवग्याच्या शेंगाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे . या प्रमाणे शेवग्याच्या शेंगा कापून स्वच्छ धुवून घ्या . एका टोपामध्ये दीड ग्लास पाणी घालून गॅस चालू करा . नंतर त्यात थोडीसी हळद आणि मीठ टाका . शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्या आणि शिजायला टोपामध्ये टाका . टोपावर झाकण ठेवून ८-१० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या . शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत गॅस बंद करा . शिवलेल्या शेवग्याच्या शेंगाचे पाणी बाजूला काढून घ्या . तुम्ही ते लहान मुलांना / मोठ्यांना सूप म्हणून प्यायला देऊ शकता . आता आपण भाजी साठी लागणारे साहित्य बघूया : १ बारीक चिरलेला कांदा , १ टोमॅटो ,कडीपत्ता ,कोथिंबीर . दीड चमचा शेंगदाण्याचा बारीक कूट ,१ चमचा मोठा कूट घ्या . भाजी बनविण्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवून १ पळी तेल टाका . तेल तापल्यावर त्यात जिरे,मोहरी टाका. व कढीपत्ता टाकून चांगले तडतडू द्या .नंतर त्यात १ बारीक चिरलेला कांदा टाका व परतून घ्या . आले लसूण पेस्ट टाका व कांदा चांगला मऊसर होइपर्यंत परतून घ्या. आता त्यात बारीक कापून घेतलेलं १ टोमॅटो टाका . चांगले परतून घ्या . नंतर त्यात अर्धा चमचा हळद पावडर,१ चमचा मिर्ची पावडर टाका . नंतर त्यात १ चमचा घरगुती मसाला, १ चमचा गरम मसाला टाकून चांगले परतून घ्या . नंतर त्यात थोडस मीठ टाका कारण शिजवताना मीठ घातलेलं आहे .थोडंसं पाणी टाकून २ मिनिटे शिजू द्या म्हणजे कांदा मस्त शिजेल . त्यात दीड चमचा शेंगदाण्याचा बारीक कूट ,१ चमचा मोठा कूट टाकून मिक्स करा . थोडंसं पाणी टाका व उकळी येऊ द्या त्याने ग्रेव्ही घट्ट होईल . आता यात शिजवलेल्या शेंगा टाकून चांगले मिक्स करून घ्या . नंतर थोडीसी कोथिंबीर टाकून घ्या. २ मिनिटांनी गॅस बंद करा . मस्त झणझणीत शेवग्याची भाजी तयार आहे. Please take a moment to subscribe channel रेसिपी आवडल्यास चॅनेल ला like, comment & subscribe करायला विसरू नका Thanks For Watching Like,Comment & Subscribe