KHED | ठळक घडामोडी | बुधवार २८.१०.२०२० | PUNE LIVE

KHED | ठळक घडामोडी | बुधवार २८.१०.२०२० | PUNE LIVE

OCTOBER 28,2020 | KHED | CHAKAN | DAILY UPDATE | डॉक्टर दाम्पत्याला मारहाण रुग्णालयाचे पाणी व वीज बिलाचा वाद जागा मालकावर गुन्हा दाखल पाणी आणि वीज बिलावरून झालेल्या वादातून जागा मालकाने आपल्याच जागेत हॉस्पिटल चालविणाऱ्या दाम्पत्याला शिवीगाळ, मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. सदरची घटना चिंबळी फाटा येथे घडली. मंगळवारी (दि.२७ ) सायंकाळी उशिरा या बाबत चाकण पोलीस ठाण्यात डॉक्टर दाम्पत्याने फिर्याद दिली असून जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. लक्ष्मी मनदीप जयम ( वय 26 रा. चिंबळी फाटा, कुरुळी मूळ रा. मोशी ) यांनी या बाबत चाकण पोलिसांत फिर्याद दिली असून त्यावरून विक्रम जैद ( रा. कुरुळी, ता.खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोमवारी (दि.26 ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता फिर्यादी डॉ.जयम चालवीत असलेल्या वसुंधरा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये याच हॉस्पिटलच्या जागेचे मालक जैद आले. रुग्णालय चालक आणि जागेचे मालक त्यांच्यात हॉस्पिटलचे पाणी आणि वीज बिलावरून जानेवारी 2020 पासून सुरु असलेल्या वादाच्या कारणावरून सोमवारी ( दि. 26) सायंकाळी सहा वाजता जैद यांनी फिर्यादी डॉ.लक्ष्मी यांचे पती डॉक्टर मनदीप सुधाकर जयम यांना हॉस्पिटलमध्ये घुसून शिवीगाळ व मारहाण केली . ताबडतोब माझ्या जागेतील हॉस्पिटल खाली कर तुला कुठे तक्रार करायची ते कर मी पोलिसांना पैसे देऊन मॅनेज करेल. जर तु माझी जागा खाली केली नाही तर मी तुला ठार करीन . अशी धमकी दिली . पतीला मारहाण केल्याच्या फिर्यादी डॉ. लक्ष्मी मध्ये पडल्याने त्यांना देखील मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चाकण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, महाळुंगे पोलीस पुढील तपास सुरू आहे. --------- खाजगी व्हिडीओ मिळवल्याची बतावणी करीत तरुणीकडे शरीर सुखाची मागणी मित्रा सोबत लव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीचा मित्रा सोबतचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगून संबंधित तरुणीला भेटण्याची व संबंध ठेवण्याची मागणी एका भामट्याने मोबाईल फोन वरून केली आहे. या बाबत संबंधित तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी जाधव ( पूर्ण नाव पत्ता निष्पन्न नाही ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे . या बाबत प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी तरुणी तिच्या मित्राच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहात आहे. तिने तिच्या मित्राच्या सोबत एक खाजगी व्हिडीओ बनवला आहे. तो व्हिडीओ तिच्याकडून कुठे तरी सेंड झाला असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरोपी बालाजी याने २९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान संबंधित तरुणीशी वारंवार मोबाईल वरून संपर्क साधून लातूरला भेटायला ये, किंवा मी पुण्याला आल्यावर मला भेट , तुला व्हिडीओ दाखवील माझ्या सोबत संबंध ठेव अशी मागणी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत. ---------- चाकण ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाच्या समोर खाजगी वाहनांची पार्किंग केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णवाहिका, व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशी वाहतूक वाहतूक करणारी हि वाहने येथून हलवावीत अशी मागणी करण्यात येत आहे. -------- खेड घाटातील बाह्यवळणाचा एकेरी मार्ग आज बुधवार दि. २८ ऑक्टोबर २०२० पासून वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. खेड घाटातील नेहमीच होणारी वाहातुकीची कोंडी आणि अपघातप्रवण वळणा मधून यामुळे सुटका होण्यास मदत झाली आहे.नाशिक पुणे महामार्गावरील बायपास रस्त्यांची कामे भुसंपादन,मोबदला यात अडकली होती. खेड घाटातील बाह्यवळणाचे काम घेतलेल्या ठेकेदारांने वेळेत पुर्ण न केल्याने रखडले होते. शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या कार्यकाळात सततच्या पाठपुराव्याने हे काम सुरु झाले होते. खेड घाटातील बाह्यवळण मार्गावरचे काम कोरोनाच्या काळात बंद पडले होते. अनलाँक नंतर हे कामे जलदगतीने सुरु होऊन चौपदरीकरणाच्या एका बाजुच्या रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे मंचरहुन खेड कडे येणा-या वाहनांसाठी हा महामार्ग आता खुला करण्यात आल्यामुळे खेड घाटातील वहातुक कोंडीसह सततच्या अपघाताच्या घटनांना पूर्णविराम मिळणार आहे. खेड कडुन मंचर बाजुकडे जाणारी वाहने जुन्या खेड घाटातुन जाणार असली तरी आज अनेक वाहन चालकांनी मंचरकडे जाण्यासाठी नवीन बाह्यवळण महामार्गाचा वापर करुन या मार्गावरील प्रवासाचा आनंद घेतला. ------- खेड तालुका शिवसेनेच्या आढावा बैठकीत माजी आमदार कै. सुरेशभाऊ गोरे यांच्या राजकीय वारसदाराच्या मुद्दा समोर आल्याने त्यांचा राजकीय वारसा कोण चालविणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. माजी आमदार कै.सुरेशभाऊ हे अत्यंत मनमिळावू , दम नव्हे तर धीर देणारे राजकारणी, शांत , संयमी , प्रचंड लोकसंग्रह असलेले नेते म्हणून तालुक्यात परिचित होते. त्यांचा विचार तालुक्याच्या राजकारणात टिकावा अशी हजारो कार्यकर्त्यांची भावना आहे. गोरे कुटुंबीयांतील तरुण पिढीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर झळकू लागले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राउत पुढील दोन दिवसात गोरे कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर या बाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ---------- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये कांद्याच्या भावात बुधवारी दि. २८ ऑक्टोबर २०२० रोजी आणखी घट झाली. कांद्याला प्रतीक्विंटलला ४ ते ५ हजार रुपये एवढा दर मिळाला. बुधवारी चाकण मध्ये सुमारे १ हजार पिशवी कांद्याची आवक झाल्याचे बाजार समिती प्रशासनकडून सांगण्यात आले. --------- PUNE LIVE NEWS | MARATHI पुणे लाईव्ह न्यूज | मराठी संपर्क | ७०२०३७३०९१ व्हिडीओ एडिटिंग | प्रणव व यश दुधवडे,चाकण KHED , VIDEO #Daily, #UPDATE, #PUNELIVENEWS, #affairs, MAHARASHTRA , INDIA , #CHAKAN, #RAJGURUNAGAR #ALANDI #Shivsena #MpShivajiraoAdhalraoPatil #PuneNashikHighway #PuneNashikRailway