Mirachi Cha Lonacha | मिरचीचे लोणचे |

Mirachi Cha Lonacha | मिरचीचे लोणचे |

मिरचीचे लोणचे : साहित्य: हिरवी मिरची १५० ग्रॅम मोहरीडाळ ३० ग्रॅम मेथीदाने १ १/२ चमचा बडीशोप २ चमचे मीठ. ३ चमचे हळद पावडर १ चमचा हिंग १/२ चमचा लाल तिखट १ चमचा मीरे १ १/२ चमचा लंवग १/२ चमचा लिंबु ४ कृती: प्रथम मिरचीचे बारीक तुकडे करून घ्या व नंतर मेथी ,लंवग , मिरी, बडीशोप , हे सर्व मिक्सर मधे बारीक करून घ्या व नंतर सर्व बरीक केलेले साहित्य व हळद, मिठ ,तिखट, हिंग ,मोहरी ,डाळ हे सर्व एका पॅन मधे बारीक गॅसवर ४ मिनिटे भाजून घ्या असे भाजल्या नंतर लोणचे खराब नाही होत जास्त टिकते व भाजलेले साहित्य गार होऊ दया नंतर तेल कडकडीत गरम करून घ्या व नंतर गार होऊ दया नंतर सर्व मसाला मिरची मधे मिक्स करून घ्या व गार केलेले तेल पण मिरची मधे घालून घ्या व सर्व मिक्स करून बरणी मधे भरून घ्या व बरणीचे झाकण लाऊन घ्या तर आपले लोणचे तयार आहे ५ ते ६ दिवसा नंतर लोणचं खायला तयार होते! सुचना : 1)बरणी स्वच्छ घासून वाळवलेली पाहिजे नंतर पुसून घ्या व नंतर लोणचे भरा 2)ओला चमचा लोणच्यात नाही घालायचा 3)तेल नेहमी लोणच्याच्या वरती पाहिजे 4)मिठ पण प्रमाणत पाहिजे 5)लोणच्याची बरणी रोज हलविणे लोणचे मुरे पर्यंत हे सर्व पाळले तर लोणचे जास्त टिकते. धन्यवाद